प्रतिनिधी , नाशिक : नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे…इगतपुरी तालुक्यातील खेड परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याने आवडू आवाली यांच्यावर हल्ला चढवला, यात ते गंभीर जखमी झाले आहेत. शेतातून घरी येत असताना रस्त्यात रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला.. यात त्यांच्या कानाला मानेला गंभीर दुखापत झाली,सुदैवाने त्यांच्या आवाजाने शेजारील नागरिक धावून आले,त्यामुळे बिबट्याने पळ काढला..आता त्यांना जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलय.. त्यांची प्रकृती सद्या ठीक असून उपचार सुरू आहेत.मात्र या परिसरात सतत बिबट्याचे हल्ले होत असल्याने परिसरतील नागरिक भयभीत झाले आहेत.
