प्रतिनिधी , जालना : जालना शहरातील नवीन जालना भागातील प्रसिद्ध असलेल्या ‘मूर्ती वेस’ला अज्ञात वाहनाने धडक दिलीय. त्यामूळे ही वेस कोसळण्याची भिती व्यक्त केल्या जात आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनानं या मार्गावरील वाहतूक काही दिवसांसाठी बंद केली आहे.काल रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने या वेशीला धडक दिली. त्यामूळे या वेशीच्या छतावरील भाग कोसळून खाली पडला असून वेशीला मोठ- मोठे तडे गेले आहेत.या वेशीला इतिहासिक पार्श्वभूमी असून १८८८ साली निजामकाळात ही वेस बांधली गेली आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मंगळबाजार या रहदारीच्या रस्त्यावर ही वेस असल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
