जनतेज न्युज

निमखेडीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसण्यावरून वाद,पोलिसांवरही दगडफेक

प्रतिनिधि , जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री बसवण्यात आला होता. हा पुतळा अनाधिकृत बसवण्यात आला होता. ही माहिती मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला मिळताच तात्काळ पोलिस स्टेशनचे कर्मचारी निमखेडी येथे दाखल झाले. अनाधिकृत शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकण्याबाबतची माहिती पोलीस देत असताना काही अज्ञात जमावाने पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस जखमी झाला आहे. त्यामुळे निमखेडीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या निमखेडीमध्ये जास्तीचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जळगावचे एसपी प्रवीण मुंडे यांनी निमखेडीला भेट देऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.