प्रतिनिधी , सोलापूर : नीटची परीक्षा दिलेल्या सोलापूरच्या विद्यार्थिनीला केंद्रीय शिक्षण विभागाने सुरुवातीला पास म्हणून रिझल्ट दिलेला असताना नंतर चक्क फेल म्हणून रिझल्ट दिल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
केंद्रीय शिक्षण विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल 13 सप्टेंबर रोजी लागला,
यामध्ये सोलापूरच्या ऐश्वर्या पवार हिला 276 मार्क मिळाले,
नीट परीक्षा पात्र होण्यासाठी यावर्षी नियमाप्रमाणे 147 मार्क मिळणे आवश्यक होते,
त्यानुसार नीट परीक्षा पात्र झालेल्या ऐश्वर्या पवारने महाविद्यालय निवडीसाठी रजिस्ट्रेशन केले मात्र,
ऐश्वर्याचे रजिस्ट्रेशन होऊ शकले नाही,
त्यानंतर ऑनलाईन ऐश्वर्या पवार हिचा नीट परीक्षेचा निकाल पाहण्यात आला त्यात तिला चक्क 41 मार्क मिळाल्याचे दिसून आले,
दरम्यान ऐश्वर्याच्या परिवाराने नीट च्या हेल्पलाईन नंबर ला कॉल करून तक्रार नोंदवली,
रीतसर ई-मेल ही केला मात्र त्याचा प्रतिसाद मिळतं नसल्याने पवार कुटुंबीयांनी आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
