जनतेज न्युज

नुकसान भरपाई मिळाण्यासाठी शेतकऱ्यांचे धरणावर उपोषण सुरूच…

आज उपोषणाचा सहावा दिवस…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उपोषणाला पाठिंबा…

प्रतिनिधी , बुलडाणा : निम्न ज्ञानगंगा प्रकल्प 2 बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्प प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी धरणाच्या भिंतीवर आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज सहावा दिवस असून काल पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथाळे यांनी या उपोषणास पाठिंबा दिल्याने अवथळे यांनी मागण्या मान्य केल्या बंद करू असा इशारा दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे…
खामगाव तालुक्यातील निमकवळा,काळेगाव आणि दिवठाना शिवारातील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प 2 बाधित शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या अधिकृत करण्यात आले आहे परंतु नुकसानभरपाईची त्यांना मिळाली नाही यासंदर्भात संबंधित विभागाकडे दाद मागितली असता अधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोप करत या शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे प्रशासनाच्या आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी थेट धरणाच्या काठावर 26 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू आहे. या बुलडाण्यातील निमकवळा,काळेगाव आणि दिवठाना शिवरातील काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा देताच आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज कालव्याचे पाणी बंद करू असा इशारा दिला होता. मात्र पोलिसांच्या उपस्थितीमुळे आंदोलनास स्थगित करण्यात आले आहे. यावेळी संपादित केलेल्या जमिनीच्या फळझाडांचा मोबदला मिळावा, डुबित शेत जमिनीचा मोबदला मिळावा तसेच प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष श्याम अवथाळे यांनी दिला आहे.. गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण धरणाच्या काठावर सुरू आहे त्याठिकाणी ज्ञानगंगा अभयारण्य आतील पाण्याचा धोकाही या उपोषणकर्त्यांची शेतकऱ्यांना आहे अद्याप पर्यंत सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी या उपोषण मंडपाला भेट दिली नाही या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे जोपर्यंत सरकार याची दखल घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी घेतली आहे.