प्रतिनिधी, सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे निलंबित प्रवक्ते नवीन जिंदाल आणि नुपूर शर्मा यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्य विधान केल होत.यामुळे संपूर्ण जगातील मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत.
त्यामुळे या दोघांना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर माकपाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून निषेध व्यक्त केला.
यामोर्चामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम महिलांनी सहभाग नोंदवाला होता.
