जनतेज न्युज

पंकजा ताईंसाठी विधानपरिषद म्हणजे काय जीवन मरणाचा प्रश्न नाही आहे.- प्रवीण दरेकर

प्रतिनिधी, औरंगाबाद :

आज शनिवार 11 जून रोजी भाजपाचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की,
राज्यसभा निवडणुकांमध्ये भाजपाचे तीन एक खासदार निवडून आले असून याचे सर्व यश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे जाते. देवेंद्र फडवणीस यांच्या मायक्रो नियोजनामुळे भाजपाचे खासदार निवडून आले आहेत. आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप बाजी मारणार असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली असून आगामी निवडणुकांमध्ये हाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल असाही विश्‍वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार त्यांचा मोठा पराभव झाला असून हे शिवसेनेचे अपयश आहे. तर त्यांच्या जागी कोल्हापूरचे धनंजय महाडिक भाजपाच्या नेतृत्वाखाली निवडून आले असून आणि ही सर्व कमाल भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी घडवून आणल्याची गवई यावेळी विरोधी पक्षनेते व भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आज रोजी दिली आहे. पंकजा ताई अजिबात नाराज नाही आहेत.
त्यांच्या साठी विधानपरिषद म्हणजे जीवन मरणाचा किंवा मोठा प्रश्न नाही आहे. संजय राठोड यांना मंत्री मंडळात आणण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. विधानपरिषदेत तर आमचे ६ उमेदवार आहेत. हिंदुत्वापेक्षा सत्ता प्यारी झाली आहे.