जनतेज न्युज

पंचगंगा नदीची धोकापातळीकडे

प्रतिनिधी , कोल्हापूर : गेल्या तीन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या बारा तासात नागरी वस्तीत पावसाचे प्रमाण कमी असले तरी राधानगरी आणि काळम्मावाडी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. राधानगरी धरण 98 टक्के भरले असून कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदी (Panchganga River) 41 फुटांवरून हात असून 39 फूट इशारा पातळी मानले जाते. तर 43 फूट ही धोक्याची पातळी मानले जाते. धोक्याची पातळी गाठण्यासाठी अवघे दोन फूट बाकी आहे.

Panchganga riverपंचगंगा नदीची पाणीपातळी ४१.२ फुटांवर पोहोचली आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील 102 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शहरात पावसाचा जोर कमी, धरण क्षेत्रात मात्र पावसाचा जोर कायम आहे.

राधानगरी धरणाचे स्वयंचलीत दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर मार्गे कोकणात जाणारा गगनबावडा रत्नागिरी रस्ता दोन दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद आहे. अनेक रस्त्यांवर पाणी आल्यामुळे सुमारे 40 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.