पाचपावली येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीमेचा आरंभ झाला.
प्रतिनिधि , नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोव्हॅक्सीनचे 42 हजार डोस प्राप्त झाले असून यामध्ये ग्रामीण भागासाठी 17 हजार 600 तर शहरासाठी 24 हजार 400 तसेच कामठी कॅन्टोनमेंटसाठी 500 डोसेसचा समावेश आहे. आरोग्य विभागांअर्तगत येणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आदींची नोंदणी केली असून त्यानुसार प्रत्येक केंद्रांवर शंभर व्यक्तींना डोस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील बाराही केंद्रांवर लसीकरणाची संपूर्ण व्यवस्था असून, प्रत्येक केंद्रांवर पाच वैद्यकीय कर्मचारी असलेले पथक लसीकरण मोहीमेत सहभागी आहेत
नागपूर शहरात पाच केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये डागा महिला रुग्णालय, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय तसेच पाचपावली येथील महापालिकेच्या वैद्यकीय केंद्राचा समावेश आहे. कोविशिल्डचा पहिला डोस दिल्यानंतर अर्धातास या केंद्रावरच थांबवून वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिॲक्शन झाल्यास तात्काळ उपाययोजना करण्यात येईल
