प्रतिनिधी , जळगाव : जळगाव ॲकर – पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला घवघवीत यश मिळाले आहे. या निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर जळगावात शिवसेनेचे वतीने फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
