जनतेज न्युज

पनवेल महानगर पालिकेसमोर एकाचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

प्रथिनिधी, नवी मुंबई : पनवेल शहरातील जुन्या कन्या शाळेच्या जागी बांधण्यात आलेल्या नव्या इमारती मधील शाळेला दि.बा पाटील यांचे नाव देण्यात यावे असा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला मात्र शहरातील स्वातंत्र्य सेनानी उत्तराधिकारी संघटनेचा याला विरोध आहे,कन्या शाळेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या नव्या इमारतीला हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी संघटनेचे सदस्य आणि हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे नातू नागेश हिरवे केली.याबाबत पालिकेने 1 जून पर्यंत मुदत दिली होती 1 जून पर्यंत झाले नाही तर पालिकेच्या समोर येऊन आपण आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता आणि त्याच अनुषंगाने आज नागेश हिरवे यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पेटवणार तत्पूर्वी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये आणले, आमचा दिबा पाटील यांच्या नावाला विरोध नाही ज्या ठिकाणी शाळा होत आहेत त्यात एक मराठी आणि दुसरी इंग्रजी माध्यमाच्या दोन शाळा निर्माण होतात,त्यात इंग्रजी माध्यमाला दीबा पाटील यांचे नाव द्यावे तर मराठी माध्यमाला स्वातंत्र्य सेनानी हिरवे गुरुजींचे नाव कायम ठेवावे अशी मागणी त्यांची होती.