प्रतिनिधी , परभणी: पाठीमागे आठवड्यापासून पडत असलेला सततचा पाऊस व अनेक वेळा झालेली अतिवृष्टी यामुळे शेत पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील महसूल मंडळातील बाभळगांव मंडळ हे अधिक प्रभावित झाले. काढायला आलेले सोयाबीन हे मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे. दिवसा व रात्री पावसाच्या सरी कोसळत आहेत. पाठीमागील गेल्या आठवड्यापासून दररोज पाऊस असल्याने शेतीत कसल्याच प्रकारची कामे करता येत नसल्याने शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम उरले नाही. काढणीचे पीक पाण्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पाथरी तालुक्यात पडत असलेल्या पाऊसाने पिकांचे पुन्हा पुन्हा नुकसान होत आहे. या पुर्वीच पाथरी ( जिल्हा परभणी ) तालुक्यातील बाभळगांव येथे अनेक वेळा जोरदार पाऊस आला आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाच्या सरीवर सरी येत आहेत. अशाच शेतकरी हतबल झाले आहेत. पडत असलेल्या सततच्या पावसाने जमिनीतील पाणी पातळी उंचावली आहे. पाथरी तालुक्यातील गोदापात्रावर बांधण्यात आलेले उच्च पातळी बंधाऱ्यातून अनेक वेळा पाण्याचा विसर्ग करावा लागला आहे. पाथरी तालुक्यात तर काही शेंगा फुटून कोंब येण्यास सुरुवात झाली आहे. अशा उत्पादनात घट होणार आहे. याचा आर्थिक उत्पन्नाला फटका बसणार आहे. बाजारात सोयाबीनचे भावही पडत आहे. यावर शेतकरी चिंताव्यक्त केली जात आहे.
बाभळगांव येथील शेतकरी व ग्रामस्थांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच बाभळगांव मंडळातील पिक पहाणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
