प्रतिनिधी , परभणी : परभणी पोलिसांनी मोठी कारवाई करत वेगवेगळ्या शहरातुन चोरी गेलेल्या तब्बल ३४ दुचाकी जप्त केल्या असून या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. परभणी, नांदेड , पुणे आणि नगर जिल्ह्यातून ह्या दुचाकी चोरी गेल्या असल्याची माहिती मिळाली आहे.
पाथरी तालुक्यातील रेनाखळी या गावातील दोन युवक शहरातील शारदा महाविद्यालय परिसरात चोरी केलेल्या 2 दुचाकी विक्री करायला आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यावर त्वरित कारवाई करत पोलिसांनी दोघांना अटक करून विचारपूस केली. यावेळी त्यांनी ३४ दुचाकी चोरी केल्याचे मान्य केले आहे. चोरी केलेल्या इतर दुचाकी रेनाखळी येथील शेतात लपवले असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलीसांनी शेतात लपलवलेल्या दुचाकी आणि आणखीन २ आरोपी अशा एकूण ४ आरोपींना अटक केली असुन चोरांकडून आणखीन काय निष्पन्न होते याचा तपास पोलीस करत आहे.
