जनतेज न्युज

पाऊस नसल्याने चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट – दीपक साळुंखे कृषी अधिकारी

प्रतिनिधी , जळगाव : तालुक्यात जून महिना संपल्यानंतरही पावसाचे पाहिजे त्या प्रमाणात आगमन झालेला नाही परंतु हवामान खात्याने दिलेल्या निर्देशानुसार व शासनाच्या कृषी विभागाचे आव्हानुसार जून महिन्यानंतर शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी पेरणी केलेली आहे आणि करीत आहे परंतु जुलै महिन्याच्या पहिला आठवडा संपत आला आहे तरी देखील पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे आतापर्यंत चोपडा तालुक्यात 87 मिलिमीटर पाऊस झाला आहे तो देखील ठराविक भागात झाला असल्याकारणाने शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली आहे येणाऱ्या दोन दिवसात सक्रिय पाऊस न झाल्यास तर चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पेरणी वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी सांगितले.