जनतेज न्युज

पाचोरा येथील कृष्णापुरी भागातील महिलांनी विविध मागण्यांसाठी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

प्रतिनिधी, जळगाव : पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील काही घराचे न काढलेल्या अतिक्रमणाचे अपुर्ण राहीलेले काम पुर्ण करुन तसेच समोरील प्लॉटधारक यांचे झालेले अतिक्रमण देखील काढून गल्लीत भुमिगत गटारी करुन गल्लीतील रस्त्याच्या मधोमध येणारे विजेचे पोल रस्त्याच्या एका बाजुला करण्यात यावी, या विविध मागण्यांसाठी आज पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना स्थानिक महिलांनी निवेदन दिले.

पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते ते अतिक्रमण संपुर्ण गल्लीत निघाले परंतु जेथुन गल्लीत जाण्यासाठी सुरुवात होते. त्याच्या घराचे अतिक्रमण मात्र नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काढले नाही. संपुर्ण गल्लीत जर तुम्हाला कोठेही अडथळा निर्माण झाला नाही. तर तुम्ही एका घरासाठी ते काम अपुर्ण का राहु दिले आहे. हा सर्रास गल्लीतील नागरीकांवर अन्याय झाला आहे. त्या एका घराचे अतिक्रमण त्वरीत काढून तेथे रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे जनतेला होणारा त्रास यांचा विचार करुन भुमिगत गटार लवकर करुन मिळावी.

कृष्णापुरी भागातील त्या गल्लीत अतिक्रमण काढले आहे तेथे समोरील प्लॉटधारक यांना वापर नसुन त्यांनी देखील त्या भागात अतिक्रमण केले आहे ते देखील अतिक्रमण लेआऊट नुसार आपण काढणार होते त्यांनी देखील गल्लीत सांडपाणी सोडले आहे. गल्लीतील रहीवाशींना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अतिक्रमण मध्ये बरेच घरांचे बाथरुम देखील तोडले गेले आहेत. महिलांना सकाळी 4 वाजेपासुन उठून अंघोळ करावी लागते. कारण अंघोळीसाठी त्यांना बाथरुम देखील राहीलेला नाही. त्यांना त्या महिलांचे अघोळीसाठी देखील हाल होत आहे. असे असुन देखील संपुर्ण गल्लीचे अतिक्रमण निघाले व त्या एका घराचे अतिक्रमण निघाले नाही. हा अन्याय आम्ही जास्त दिवस सहन करणार नाही. गल्लीत लहान लहान मुल आहेत यांचा विचार करुन आपण काही घराचे अर्धवट राहीलेले अतिक्रमण काढावे व तेथील रस्ता मोकळा करुन दयावा. व समोरील प्लॉटधारक यांचे देखील लेआऊट नुसार त्यांनी केलेले अतिक्रमण हे देखील काढावे अशी मागणी आज पाचोरा मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.