जनतेज न्युज

पालघर साधू हत्याकांड प्रकरणाची सीबीआय किंवा एनआयए मार्फत चौकशी करा – आशिष शेलार

प्रतिनिधी , मुंबई : पालघर साधू हत्याकांड प्रकरणी पोलिसांची पगार कपात केली, असे ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयात सांगते. म्हणजे साधू हत्या प्रकरण इथे संपते का? मुळ घटना आणि आरोपींना वाचवायचे? सर्वोच्च न्यायालयाने नव्याने आरोपपत्र दाखल करण्यास सांगितले. त्यामुळे सीबीआय किंवा एनआयए मार्फत चौकशी करा अशी मागणी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे.