प्रतिनिधी , पुणे : बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशाजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. राज्यात विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात (Marathwada) विजेच्या कडकडाटासह पावसाचा (Rains) इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अरबी समुद्रात शनिवारी सकाळी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र गेल्या २४ तासात आणखी ओमानच्या दिशेने सरकले आहे़ गुजरातमधील वेरावळपासून ते ५९० किमी दूर गेले आहे़ येत्या २४ तासात ते आणखी पश्चिमेला जाऊन त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या २४ तासात ते आणखी विकसित होण्याची शक्यता आहे.
