जनतेज न्युज

पुणे जिल्ह्यात गेल्या १२ तासात २६७ रुग्णांची वाढ;एकूण रुग्णसंख्या ३७ हजार ६८१वर

प्रतिनिधी , पुणे : शहरात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे १३ जुलै पासून शहरात पुन्हा कडक लॉकडाउन घेतला आहे. जिल्ह्यात गेल्या १२ तासात २६७ रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण रुग्णांची संख्या ३७ हजार ६८१ वर गेली आहे. तर आतापर्यंत १ हजार ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या आणखी दोन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. भाजपच्या एक तर शिवसेनेच्या एका नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत महापालिकेतील एकूण ८ नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज कोरोनाबाधित आढळलेल्या नगरसेवकांमध्ये सौम्य लक्षणं असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहे.