जनतेज न्युज

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, 2160 मतदान कर्मचारी, 856 आरोग्य कर्मचारी नियुक्त

प्रतिनिधी , पुणे : पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. निवडणूक प्रक्रीयेसाठी विभागात 2 हजार 160 मतदान कर्मचारी, 856 आरोग्य कर्मचारी, तर 423 निवडणूक निरीक्षक नियुक्त केले आहेत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क्स, थर्मल स्कॅनिंग आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दष्टीने सर्व प्रकारची साधनं कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत. आज (30 नोव्हेंबर) रात्री 12 नंतर मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले जाणार
निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी

  1. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पाच जिल्ह्यांचा समावेश होतो
  2. यंदा पदवीधर मतदारसंघात 62 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत, तर शिक्षक मतदारसंघात एकूण 35 उमेदवार उभे आहेत.
  3. पुणे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 1 लाख 36 हजार 611 इतकी आहे, तर शिक्षक मतदारसंख्या 32 हजार 201 इतकी आहे.
  4. पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी एकूण 232 मतदानाची केंद्रं तयार करण्यात आली आहेत, तर शिक्षक मतदानासाठी 125 मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.
  5. मतदार याद्यांमधील नावातील घोळामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता जास्त आहे,
  6. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोनाचे नियम पाळून जास्तीत मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.
  7. निवडणुकीसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. परंतु बोगस मतदान रोखण्यासाठी प्रशासनाला करडी नजर ठेवावी लागणार आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदान केंद्र ही हवेली तालुक्यात आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 15 किलोमीटरची हद्द लक्षात घेऊन मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.