जनतेज न्युज

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार चुरशीची.. यात राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्यात खरी लढत होणार आहे..

प्रतिनिधी , पुणे : पुणे पदवीधर मतदार संघासाठी आज मतदान होतंय बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी आज बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी च्या शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला..
राज्यात महाविकास आघाडीचे आघाडीचे सरकार आल्यापासून वातावरण स्वच्छ झालं आहे.. निवडणूक ही प्रतिष्ठेची नसून पदवीधर आणि बेरोजगारीचे प्रश्न संवेदनशील पणे मांडण्यासाठी ही निवडणूक आहे, असं मत यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. यावेळी योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा बद्दल बोलताना सुळे म्हणाल्या महाराष्ट्रात त्यांचे स्वागतच आहे. आम्ही कोथ्या मनाची माणसं नाहीत, बॉलिवूड आणि मुंबईचं नातं हे दुधात साखर असल्यासारखा आहे. केंद्र सरकारने मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे. भाजपची संघटना स्थिर ठेवण्यासाठी त्यांच्या नेतेमंडळींना सरकार पडणार असल्याचे बोलावे लागत आहे.