प्रतिनिधी, पुणे : राज्यात कोरोनाचे संकट (Corona crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यातही कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुणे आणि मुंबई सारख्या शहरात आहे . यापार्श्वभूमीवर पुण्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निधीची कमतरता भासू दिली नाही, यापुढेही निधीची कमतरता भासणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला. कोणत्याही परिस्थितीत पुण्याचा कोरोना (Pune Corona) संसर्ग आटोक्यात आला पाहिजे त्यासाठी प्रशासनाने झटून काम करा, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.
ही बातमी पण वाचा:- अन् माझ्यावर मायेची सावली माझ्या विठ्ठलाने धरली ; शरद पवारांचे कौतुक करत आव्हाड भावुक
पुण्यातील विधानभवन सभागृहात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागात नियंत्रण मिळवा तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेत काम करा, गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थांना सोबत घेत पुण्याला कोरोनामुक्त करूया, असा आशावाद व्यक्त करतानाच येत्या काही दिवसात आपण सर्व मिळून कोरोनावर निश्चितपणे मात करू, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला
