जनतेज न्युज

पुण्यात आज महाविद्यालयांची घंटा वाजली !

प्रतिनिधी , पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून महाविद्यालये बंद करण्यात आली होती.त्यानंतर अनेक मुले आपल्या गावी परत गेल्यामुळे वसतिगृहे ही बंद करण्यात आली होती.याचदरम्यान महाविद्यालये बंद असल्यामुळे काही महाविद्यालयांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेल्यानंतर पालक,विद्यार्थी, विविध राजकीय संघटनानी महाविद्यालये सुरू करण्याची मागणी केली होती.
अखेरीस सर्व काळजीनिशी राज्य सरकारने महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे.त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत.पुण्यात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी काहीसा प्रतिसाद देत वर्गात हजेरी लावली. तर काही महाविद्यालयांनी फक्त प्रँक्टिकल वर्ग सुरू करण्यास प्राधान्य दिले आहे.