जनतेज न्युज

पुण्यात कोरोनाचे थैमान ; कोरोनाबाधितांची संख्या ३६ हजाराच्या जवळ

प्रतिनिधी , पुणे : राज्यात कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे . पुणे शहर व जिल्ह्यात शुक्रवारी १ हजार ५९८ जणांना करोनाची लागण झाली असून, एकूण रुग्णसंख्या ३६ हजाराच्या टप्प्याजवळ जाऊन पोहोचली आहे. दिवसभरात शहर व जिल्ह्यातील २८ जणांचा मृत्यू झाल्याने, एकूण मृतांची संख्या १०११ झाली आहे.
पुणे शहरात दिवसभरात ९१६ रुग्ण आढळून आले आहेत, तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे पालिका हद्दीतील मृतांची संख्या ८०० वर पोहोचली आहे. दिवसभरात ६०९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात करून घरी परतलेल्यांची संख्या १६ हजार १८८ झाली आहे. पिंपरी चिंचवड मध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुणे ग्रामीणमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात ९ हजार ०८९ अक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी ४४३ जणांची प्रकृती गंभीर असून, ७४ जण व्हेंटिलेटरवर, तर ३६९ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.