महादेव मंदिराला पाण्याचा वेढा.. महाराणी ताराराणी आणि थोरले शाहू महाराज समाधी बुडाली कृष्णेच्या पात्रात…
प्रतिनिधी , सातारा : साताऱ्यातील दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या संगममाहुली येथील महादेव मंदिराला कृष्णा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे.. मंदिरालागत असलेलं महाराणी ताराराणी आणि थोरले शाहू महाराज यांची समाधी पाण्यात बुडाली आहे..येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या पायऱ्या आणि नंदी पाण्यात बुडाला असून धोका वाढला आहे.. नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली असून हुल्लडबाजांकडून पुराच्या पाण्यात उड्या मारून मृत्यूला आमंत्रण दिले जात आहे.. प्रशासनाने याठिकाणी पोलीस तैनात करून येथे येणाऱ्यांना बंदी घालावी अन्यथा दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..
