जनतेज न्युज

पुरोगामी महाराष्ट्र मध्ये सांस्कृतिक शहर ओळखल जाणार पुण्यामध्ये सापडल अंधश्रद्धा झाड.

प्रतिनिधी , पुणे : पुण्यातील खडकी येथील होळकर ब्रीजच्या खाली म्हसोबा मंदिराच्या आवारात झाडांना करणीच्या नावाने काळ्या बाहुल्या ,फोटो, बिबवे,लिंबू, साळींदर पक्ष्यांची काटे तसेच दांभण खिळांच्या साह्याने झाडामध्ये ठोकण्यात येतात.अशी अघोरी आणि अनिष्ट प्रकार या ठिकाणी दर अमावस्या-पौर्णिमेला चालतात.गेली चार वर्ष सातत्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याबाबत खडकी पोलिसांना माहिती देऊन त्या झाडा मध्ये ठोकलेले खिळे बाहुल्या काढून टाकून जाळून टाकण्यात येतात.परंतु अद्यापही त्या ठिकाणी कोणत्याही अज्ञात व्यक्तीविरुद्ध “जादूटोणाविरोधी कायद्या” अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून घेणे गरजेचे आहे पण तो नोंदवण्यात आला नाही.गेली चार वर्ष दर अमावस्या-पौर्णिमेला मी याबाबत माहिती घेत असते परंतु तो प्रकार कमी होण्याऐवजी जास्त प्रमाणात वाढत चाललेला आहे.आज या ठिकाणी अशा अनिष्ट अघोरी प्रथा जर घडत असतील तर उद्या त्या ठिकाणी नरबळी सारखे प्रकार ही घडू शकतात. तरी या बाबत लवकरात लवकर कारवाई करणे गरजेचे आहे.या भागामध्ये फलक ही लावणे गरजेचे आहे. जर या ठिकाणी कोणी झाडाला करणीच्या नावाने जर कोणी खिळे ठोकताना दिसले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. परंतु अद्यापही त्या ठिकाणी कोणताही फलकही लावण्यात आलेला नाही.अजूनही या झाडांवर ती करणीच्या नावाने झाडाला इजा पोचली जात आहे. तरी याबाबत प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे जिल्हया तर्फे करत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे या झाडाच्या काळ्या बाहुल्या काढून टाकण्यात आल्या आहेत याचा आढावा घेतला आहे सागर आव्हाड यांनी