प्रतिनिधी : सतत होत असलेली पेट्रोल व डिझेल दरवाढ तसेच शेतकरी विरोधी वक्तव्य करणारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ धाराशिव शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. शेतकरी आंदोलनाविषयी अक्षेपक विधान करणाऱ्या ना रावसाहेब दानवे यांचा व केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल , डिझेलची दरवाढ होत असल्याने याचा निषेध करण्यासाठी धाराशिव शिवसेनेने उस्मानाबादेत आंदोलन केले . यावेळी उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते , तालुकाप्रमुख सतीश सोमाणी , नगरसेवक सोमनाथ गुरव ,पस सदस्य संग्राम देशमुख व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते .
