प्रतिनिधी , मुंबई : एकीकडे कोरोना संक्रमण दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे महागाईने सुद्धा आता पुन्हा एकदा आपले डोकेवर केले आहे. कधी पेट्रोल, डिझेल दरवाढ तर कधी गॅस दरवाढ या पाठोपाठ आता मूलभूत गरजांपैकी एक व आवश्यक सेवेतील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या दुधाची सुद्धा महागाईत भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इंधन दरवाढीमुळे व महागाईमुळे दूध संघटनांनी येत्या काळात दुधाच्या भावात वाढ होण्याचे संकेत दिले आहेत.त्यामुळेच आगामी काळात दुधाचे दर वाढणार असून त्यामुळे सामान्य नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे.
याबाबत दूध विक्रेता यांना प्रतिक्रिया विचारले असता त्यांनी दुधाचे भाव वाढल्यास नफा कमी होणार असल्याचे सांगितले. तर स्टोर मालकांनी अजून असं कोणत्याही प्रकारचे पत्रव्यवहार अजूनही त्यांच्या दुकानासोबत झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे एक मार्चपासून दूध दरवाढ वाढण्याची शक्यता कमी असल्याचे दूध स्टॉल मालकांनी सांगितले आहे.
