जनतेज न्युज

पोलिसांच्या कारवाईदरम्यान गावठी कट्टा सह आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी, शिरपूर धुळे: कर्नाटक राज्यामध्ये एका आरोपीच्या चौकशीदरम्यान धुळे जिल्ह्यातील आणखी एका संशयिताचा फोटो गावठी कट्टा सह कर्नाटक पोलिसांना आढळून आल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्याशी संपर्क साधून फोटोमधील संशयित आरोपीची चौकशीची करण्यासंदर्भात मागणी केली
कर्नाटक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संशयित आरोपी संदर्भात तपासणी करण्याचे आदेश दिल्यानंतर शिरपूर तालुका पोलिसांनी एक पथक या संशयित आरोपी च्या तपासणीसाठी तयार करून या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासणी सुरू केली असता
रोहित पावरा हा शिरपूर तालुक्यातील जोयदा येथील असल्याचे समजताच तालुका पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली व त्याच्याकडे गावठी काट्या सह दोन जिवंत कर्तुस आढळून आले आहे
या संशयिताच्या मुसक्या आवळून पोलिसांनी गावठी कट्टा सह दोन कारतूस व एक दुचाकी असा तब्बल 72 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल या संस्थेकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे