जनतेज न्युज

पोलिसांच्या वेशात आले पोलिसांवर गोळीबार केला, लोखंडेची टोळी पोलिसांनी केली जेरबंद

प्रतिनिधी , पुणे : तब्बल 14 गुन्हे केलेली लोखंडे टोळी पुणे ग्रामीण पोलिसांकडून जेरबंद झाली. याच टोळीतील प्रमोद उर्फ आप्पा ज्ञानदेव माने याने पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये वडगाव निंबाळकरचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे थोडक्यात बचावले, पण पोलीस पथकाने ही टोळी शेवटी पकडली. पप्पू उर्फ सुहास सोनवलकर व प्रमोद उर्फ आप्पा ज्ञानदेव माने हे दोघे अटल चोर मात्र फरार झाले.
कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत 6 ऑगस्ट 2020 रोजी बालाजी ज्वेलर्स या संजय किसन निकम यांच्या सराफ दुकानांमध्ये पाच जण आरोपी आले हे आरोपी पोलिसांच्या गणवेशात होते त्यांनी बालाजी ज्वेलर्सचे मालक निकम यांना चोरांकडून तुम्ही सात ग्रॅम सोने घेतले आहे ते सोने परत देणार की आमच्या सोबत पुण्याला येणार असे म्हणत त्यांनी निकम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व 34.5 तोळे सोन्याचे दागिने एक मोबाईल फोन असा 17 लाख 32 हजार रुपयांचा ऐवज दरोडा टाकून चोरून नेला त्यावेळी स्थानिक नागरिकांना थोडासा संशय आल्याने लोकांनी पाठलाग केला तेव्हा नागरिकांच्या दिशेने या पाच जणांनी गोळीबार करून नागरिकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
त्यापूर्वी आठ जुलै 2020 रोजी नीरा गावातील चितळे शॉपी दुकानाच्या आत प्रवेश करून पाणी मागण्याच्या बहाण्याने डोक्यावर रिवाल्वर लावून सोन्याची चेन सोन्याची अंगठी रोख रक्कम व मोबाईल असा 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून स्विफ्ट कार मधून पलायन केले होते आणखी एक गुन्हा वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला 26 ऑक्टोबर 2020 रोजी सराफ व्यवसायिक अमर रंगनाथ कुलथे यांच्या पळशी येथील अमर ज्वेलर्स दुकानातून खुलते हे घरी जात असताना तोंडावर मिरची पावडर टाकून तीन जणांनी बजाज पल्सर दुचाकीवर येऊन अकरा तोळे सोने व दहा किलो चांदी असा 11 लाख 65 हजार रुपयांचा दागिन्यांचा ऐवज असलेली बॅग जबरीने पळवून नेली होती
नीरा गावात ॲमेझॉन कंपनीचे स्टोअर फोडून त्यातून मोबाईल फोन डीव्हीआर रोख रक्कम असा 77 हजार 496 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.हे सर्व गुन्हे गंभीर असल्याने व लोकांमध्ये दहशत असल्याने पोलिसांनी याचा तपास करताना या परिसरातील दीडशे किलोमीटर अंतराचा मागे घेतला यामध्ये परिसरातील 200 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून संशयितांचे तांत्रिक विश्लेषण व गोपनीय खबऱ्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली होती. मात्र आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्यामुळे पोलिसांनी आपल्या पडू नये यासाठी बरीच काळजी घेत होते, मात्र जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीला गेलेला महाल चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे व शाम शिराज मुळे हे वापरत आहेत अशी माहिती खबऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यावरून वाघळवाडी येथून संशयित मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या.आणि या लोखंडे टोळीला अटक केली .