प्रतिनिधी : “म्हणून मी हा विषय सातत्याने मांडत होतो. पण सरकारच्या वतीने दुर्देवाने फक्त पाठीशी घालण्याचं काम सुरु होतं. एनआयएच्या कारवाईत अनेक पुरावे मिळाले आहेत. यातला अजून एकच भाग बाहेर आला आहे. मनसूख हिरेन यांच्या हत्येचाही खुलासा व्हायचा बाकी आहे. याबाबतही लवकर कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे. हे केवळ सचिन वाझेंपर्यंत मर्यादित नाही. यामध्ये कोण कोण आहे हे समोर यायला हवं. सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित होते. मी सत्तेत असताना शिवसेनेने त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, असं सांगितलं होतं. मात्र, हे सरकार आल्यानंतर कोरोनाचं नाव सांगून सचिन वाझे यांना घेतलं गेलं. मुंबईतील प्रत्येक केस त्यांच्याकडेच जाईल अशाप्रकारची व्यवस्था होती. पण सरकारच्या या विश्वासामुळे आपण काहीही करु शकतो, असा अॅटीट्यूड वाझेंचा होता”, अशी टीका फडणवीस यांनी केली.
“ज्यांनी घटना घडवली तेच पोलीस अधिकारी असतील तर कारवाई काय करणार? इतकं भयानक कुणी वागत असेल तर मुंबईल पोलिसांची इमेजचं काय होतं ते टीका करणाऱ्यांनी सांगितलं पाहिजे. माझं विरोधी पक्षनेता म्हणून काम आहे. संजय राऊत यांनी यंत्रणेला प्रश्न विचारला पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले.
“अशा प्रकारची माहिती मला घेऊन मांडण्याची आवश्यकता का पडली, हे संजय राऊत यांनी मांडलं पाहिजे. संजय राऊतांनी आधी यंत्रणेला विचारला पाहिजे.
राऊतांकडून कौतुक – ते माझं काम, मला अनुभव आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर त्या योग्य ठिकाणी मांडण्याचं काम मी केलं. राज्य अस्थिर करण्याचा आरोप हास्यास्पद, एक पोलीसच अशा गंभीर गुन्ह्यात असेल आणि त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम सरकार करत असेल तर हे किती योग्य? सचिन वाझेंना का घेण्यात आलं? त्यांना एवढं मोठं पद का देण्यात आलं?”, असे सवाल फडणवीस यांनी केले.
