जनतेज न्युज

पोलीस खात्याशी “नाळ” तुटता नये – पोलीस महासंचालक हेमंत नगराळे कोरोनात मृत पावलेल्या योद्धयांच्या वारसांना पोलीस सेवेत संधी

प्रतिनिधी , मुंबई : योद्धा गमावला तरी,पोलीस खात्याशी असलेली कुटुंबाची नाळ तुटता कामा नये.यासाठीच कोरोना काळात मृत्यु पावलेल्या पोलीसांच्या वारसदारांना अनुकंपा तत्वावर पोलीस सेवेची संधी उपलब्ध करून दिली.असे कृतज्ञतेचे भाव राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी व्यक्त केले.ठाणे पोलीस आयुक्तालयातील दिवंगत पोलिसांच्या कुटुंबातील एका सदस्याला १० दिवसात प्रक्रिया राबवुन पोलीस खात्यातील विविध पदावर नियुक्तीचे पत्र नगराळे यांच्याहस्ते देण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव बजावत असताना मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या परिवारातील नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर आज पोलीस नौकरीत समाविष्ट करून घेण्याचा महत्वाचा निर्णय पोलीस महासंचालक यांनी ठाण्यात घेतला व हा निंर्णय महाराष्टभर ते लागू करणार असल्याचा निर्णय घेतल्यामुळे ,या पोलीस परिवाराच्या जीवनात आज आनंदाचा क्षणच आलाय … जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर भारतात ही लॉकडाऊन करण्यात आला होता. मुंबई, ठाण्यात तर कोरोनाने कहर केला त्यामुळे या कसोटीच्या काळात पोलिसांनी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून कर्तव्य पार पाडले. ठाणे पोलीस हद्दीत कोरोनामुळे ३४ असे पोलीस कर्मचारी शहीद झाले. त्याच्या कुटुंबातील वारसदाराला पोलिसांकडून पोलीस खात्यात नोकरी मिळाली आहे.पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याहस्ते साकेत मैदानात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस सहआयुक्त सुरेश मेकला यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
ठाणे, मुंबईत कोरोनाच्या काळात पोलिसांवर जास्त भार होता.कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी पोलिसांनी मनापासून काम केले.तेव्हा,शहीद झालेल्या पोलीस बांधवांच्या कुटूंबाची १० दिवसात कागदपत्रांची पूर्तता करून,मेडिकल चाचणी करून ठाणे पोलिसांनी महत्वाचे पाऊल उचलल्याने ठाणे पोलिसांचे कौतुक करावे,तितके कमीच आहे.असे मत नगराळे यांनी यावेळी व्यक्त केले. राज्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्य झाला आहे. भावनात्मक विचार करून पोलीस खात्याने सकारात्मक विचार केला असून कुटूंबाना आधार मिळावा यासाठी राज्यभर ठाणे प्याटर्न राबविण्यात येणार असल्याची माहिती हेमंत नगराळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान राज्यामधील कोरोना बाधित पोलीस, उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना “कोरोना वॉरियर मेडल” देण्यात यावे असा प्रस्ताव मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ठेवून मागणी करणार असल्याचे .. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी सांगितले.
माझे पती कर्तव्य बजावत शहीद झाले होते. आमच्या कुटूंबाचा आधार गेला होता. आम्हाला पोलीस दलात नोकरी मिळेल असे वाटत नव्हते मात्र ठाणे पोलिसांनी सकारात्मक विचार करून आम्हाला पोलीस दलात समाविष्ट करून घेतले त्याबद्दल मनापासून आभार वक्त करते,तर माझे बाबा आज असते तर मला जास्त आनंद झाला असता ,त्यांना मला पोलीस वर्दीत पाहायचे होते अश्या भावना नवनियुक्त कर्मचारी म्हणजेच ज्यांन आज अनुकंपावर नौकरी मिळाली त्यांनी वेक्त केल्यात …