जनतेज न्युज

प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार पुनरागमन, धुवाधार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

प्रतिनिधी, वर्धा : प्रदीर्घ विश्रांतीनंतर वर्धा जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पावसाअभावी पिके जळण्याच्या मार्गावर होती, पाऊस नसल्यामुळे पिकांची वाढ देखील खुंटली होती. आज जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून नागरीकांना सुद्धा उकाड्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.