प्रतिनिधी , वर्धा: प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरातील लाभार्थ्यांना काही टप्पा मिळाला व काही पैशांची उधारवाड व कर्ज करून काही लाभार्थ्यांनी आपली घरे बांधली काही लाभार्थी अजूनही किरायच्या घरात राहत आहे,परंतु शासनाकडून अजूनही उर्वरीत दुसरा हप्ता 90 हजाराची रक्कम शहरातील 257 लाभार्थ्यांना अजूनही मिळालेली नाही..
यामुळे सदर लाभार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे,यामुळे लाभार्थी दुहेरी संकटात सापडले आहे,याकरिता अनेक वेळा लाभार्थ्यांनी पाठपुरावा केला परंतु अजून पर्यंत कुठलही दखल शासनाने घेतली नाही,अखेर सदर लाभार्थ्यांनी शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्या कडे धाव घेतली,सुधीर पांगुळ यांनी सदर प्रकरणाची दखल घेत सर्व लाभार्थ्यांना घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी देवळीकर व नगर प्रशासन विभागाचे जिल्हा प्रशासकीय अधिकारी शाह यांची भेट घेऊन सदर प्रकरणा बाबत चर्चा करून पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांची उर्वरीत रक्कम तातडीने द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली,सदर प्रकरण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून लवकरच सदर विषय मार्गी लावू असे आश्वासन प्रशासकीय अधिकारी शाह यांनी सुधीर पांगुळ यांना दिले ..
