प्रतिनिधी , कामगार कल्याण विभागामार्फत संपूर्ण राज्यभर इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या नोंदणी होत असताना वीटभट्टीवर काम करणारे जे खरे कामगार आहेत ते या योजने पासून गेल्या कित्येक दिवसापासून वंचित होते. मात्र ही बाब कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या लक्षात येताच राज्यमंत्री बच्चू कडू हे आपले संपूर्ण प्रशासन घेऊन अमरावती लगत असलेल्या वीटभट्टीवर पोहोचले व वीटभट्टीवर काम करणाऱ्या शेकडो कामगारांची आज विटा भट्टी वरच नोंदणी करण्यात आली. त्या ठिकाणी त्यांना कामगार कल्याण विभागाचे स्मार्ट कार्ड देखील राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याच बरोबर संपूर्ण जिल्ह्यातील विटभट्टी कामगारांचा एक मे कामगार दिन मेळावा घेऊन त्यांना संपूर्ण योजनेची माहिती देण्यात येईल व हळूहळू वीट भट्टी कामगारांना या योजने मार्फत कसा लाभ मिळेल याकडे प्रशासनाने सुद्धा लक्ष द्यावे अशी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.
