जनतेज न्युज

प्रसिद्धी करण्यात वेळ वाया घालवला नसता तर कदाचित आज पत्रिपुलाचे गार्डर सरकवण्याच काम झालं असतं – मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याणच्या बहूचर्चित पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम आज 90 टक्के पूर्ण झाले. आज सकाळी दादर स्टेशनवर उद्यान एक्स्प्रेसचे इंजिन फेल झाल्याने पत्रीपुलाच्या मेगाब्लॉकला अर्धा तास उशिराने सुरुवात झाली . उर्वरित 18 मीटर गार्डर च्या लॉंचिंग साठी रेल्वेकडे 2 तासाचा मेगाब्लॉकची मागणी करण्यात आली आहे .याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली .आमदार पाटील यांनी पत्रिपुलाचा गर्डर सरकवण्यासाठी रेल्वे ने मेगाब्लॉक दिला होता मात्र या दोन दिवसांच्या मेगाब्लॉक च्या काळात पहिल्याच दिवशी जर त्यानी इव्हेंट चा कार्यक्रम केला नसता ,प्रसिद्धी करण्यात वेळ वाया घालवला नसता तर कदाचित आज हे काम झालं असतं ,मात्र काम न उरकता या कामाचा इव्हेंट करत मांडला त्यामुळे आजचे काम रखडल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे .