प्रतिनिधी , सातारा : सातारा प्रहार संघटनेच्या वतीने खंडाळा येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी निवेदन देवून सुध्दा प्रशासनाने या शासन निर्णयाकडे दुर्लक्ष केले आहे.अंपगांना न्याय देण्यासाठी तालुक्यातील दिव्यांग अपंग या घंटानाद आंदोलनाला उपस्थितीत आहे.प्रहार संघटना संबंधित व्यवस्थेवर नाराज आहे.जोपर्यंत अंपगांच्या मागण्या पुर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही आंदोलन सुरुच ठेवणार अशा इशारा प्रहार संघटनेने दिला.
खंडाळा तालुक्यातील अपंगांना शासकीय नियमानुसार विविध अडचणी येतात.अपंगांना ज्या ठिकाणी जाता येत नाही त्या ठिकाणी रॅंप,व्हिलचर लिफ्ट याची सोय असावी.ग्रामपंचायत ज्या वर आहे त्या खालच्या तळावर असावी.अशा विविध बाबींवर खंडाळा तालुक्यात लक्ष देत नाही.त्याचबरोबर दोनशे स्क्वेअरफूट जागा ५% अपंग कल्याणणनिधी अनेक ग्रामपंचायती वाटत करत नाही.प्रहार संघटनेच्या वतीने वारंवार निवेदने देऊन सुध्दा दखल घेतली नाही.या जाचाला कंटाळून प्रहार संघटनेच्या वतीने खंडाळा पंचायत समितीच्या बाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
