प्रथिनिधी, बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील दिमाखवाडी येथे तीन महिन्यांपुर्वी एक प्रेम विवाह झाला होता.प्रेमविवाहानंतर मुलीचा पती व सासु सासऱ्यांनी मुलीकडे माहेरवरुन पाच लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावला होता. हुंड्यासाठी मुलीचा मानसिक व शारिरीक छळ देखील सासरच्या लोकांंनी केला होता.मात्र मुलीने पैसे आणण्यास नकार दिल्यानं नवरा ,सासु सासरा यांनी या तरूणीवर पेट्रोल टाकुून जिवंत जाळल्या प्रकरणी गेवराई पोलिसांत तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पिडितेचा नवरा आणि सासरा यांना गेवराई पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान दिमाखवाडी येथील मुलीचा गावातीलच एका मुलासोबत प्रेम संबंध जुळले होते आणी याचं प्रेमसंबंधाचे रुपांतर प्रेम विवाहात झाले. नातेवाईकांविरोधात जाऊन लग्न झाले मात्र लग्नाला अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लोटताच सासरच्या लोकांकडून मुलीचा छळ सुरु झाला.तु पाढंऱ्या पायाची आहेस.तु आमच्या मुलाला फसवले तूझ्या आई वडिलांकडून पाच लाखं रूपये घेऊन ये असे म्हणत नवरा , सासु आणी सासरा यांनी प्रेम विवाह केलेल्या मुलीला छळण्यास सुरूवात केली .अनेकदा नवऱ्याने देखील मारहाण केली.हे एवढ्यावरचं थांबलं नाही तर त्या मुलीला अंगावर पेट्रोल ओतुन जिवंत जाळण्यात आलं…. याच प्रकरणी गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील दोन आरोपींना गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई चालु असल्याचे पोलिसांनी सांगितले
