प्रतिनिधी,यवतमाळ : आर्णी येथील एका व्यावसायिकाने आर्णी पाेलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अज्ञात व्यक्तीकडून मुलाचे अपहरण करीत त्याला ठार करण्याची धमकी दिली जात आहे. त्या मोबदल्यात एक लाखाची खंडणी मागितली आहे. आर्णीसारख्या लहानशा गावात खंडणीचा प्रकार घडल्याने पोलिसांनीही कसून शोध घेणे सुरू केले. यात फिर्यादीचा मुलगाच फेक आयडी वापरून वडिलांना धमकावत असल्याचे पुढे आले. शाळकरी विद्यार्थी असलेल्या मुलाने फेक आयडी तयार करून फेसबुकच्या माध्यमातून वडिलांना धमकावणे सुरू केले. यासाठी त्याने आकाश गिरोलकर व नंतर विनय टाके ही नावे धारण केली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यवतमाळच्या सायबर सेल टीमने अधिक तपास केला आणि या प्रकरणाचा उलगडा केला खुद्द मुलगाच बापाला धमकावत होता खंडणी चे पैसे घेऊन त्यातून फ्री फायर गेम साठी रिचार्ज करावे आणि धमकी दिल्याने जीवितास धोका असल्याचे बनाव करत नागपूरला पुढील शिक्षणासाठी जायचे यासाठी त्याने सोशल मीडियाचा आधार घेतला.
