जनतेज न्युज

बँक खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय संप…

प्रतिनिधी , बँक खासगीकरणाच्या विरोधात विविध बँक कर्मचाऱ्यांनी आज 15 आणि 16 मार्चला देशव्यापी बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या संपामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी सहभागी झाले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021- 22 च्या अर्थसंकल्पामध्ये काही बँकांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी अवसायानात किंवा दिवाळखोरीत निघालेल्या बँकांना इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये विलीन केले आहे. परंतु आता सरळ बँकेचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय बँकांसाठी घातक आहे. त्यामुळे खेड्यातून बँकिंग कमी होईल, शेती आणि शेतकऱ्यांना कर्ज कमी मिळेल, बेरोजगारांना कमीत कमी कर्ज ,छोटे उद्योग व्यवसायिकांना कमी कर्ज मिळेल , व जनतेच्या ठेवीची जोखीम वाढेल अशी साधार भीती व्यक्त करत आहे. त्यामुळे बँक खाजगीकरणाला आपला विरोध असल्याचे सांगून विविध राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसाचा संप पुकारला आहे. आज 15 मार्चला बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहे.