शिवाजीनगर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सिध्दार्थ शिरोळे
यांचा बंजारा क्रांती दल व बंजारा समाजाच्यावतीने भव्य नागरी सत्कार
प्रतिनिधी : पुणे , शिवाजीनगर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सिध्दार्थ शिरोळे यांचा सन्मान बंजारा क्रांती दल व बंजारा समाजाच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष व संयोजन बंजारा क्रांती दलाचे पुणे शहर कार्याध्यक्ष रमेश राठोड यांनी केले .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस दत्ता गायकवाड , संघटक सचिव संजय जाधव , शिव भीम संघटनेचे सचिव चंद्रकांत माने , बहुजन समाज पार्टीच्या नेत्या सुमन गायकवाड , संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य श्रीराम चौधरी , नाना गव्हाणे , पंचायत समितीचे सदस्य सर्जेराव वाघमारे , अशोक रजपूत आदी मान्यवर उपस्थित होते .
शिव भीम संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक महेश जगताप यांनी सांगितले कि , दाट लोकसंख्या असलेला वस्तीचा व त्यातील समाजातील शिक्षणासाठी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अभ्यासिका व ग्रंथालयाकरिता बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांचे भव्य सांस्कृतिक भवनाची निर्मिती करावी. अशी अपेक्षा व्यक्त केली .
या कार्यक्रमास विविध राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तसेच , सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन पुणे शहरात सामाजिक एकात्मतेचे प्रतिक निर्माण करून रमेश राठोड यांनी आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन आदर्श निर्माण केला . यावेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी सांगितले कि , बंजारा समाजाच्या बहुमोल सहकार्याने मी निवडून आलो . . त्यांनी विशेषतः महिला वर्गाचे आभार मानले .बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांचे भव्य सांस्कृतिक भवन उभारू . त्या सांस्कृतिक भवनमध्ये अभ्यासिका व ग्रंथालयची उभारणी केली जाईल . शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचा विकास साधण्याकरिता आपण कटिबध्द राहू . या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक बंजारा क्रांती दलाचे पुणे शहर कार्याध्यक्ष रमेश राठोड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन जगताप यांनी केले तर आभार दत्ता गायकवाड यांनी मानले .
