जनतेज न्युज

बदल्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या प्रश्नही लक्ष घाला : चंद्रकांत पाटील

प्रतिनिधी , पुणे : लॉकडाऊनकाळात(Lockdown) आघाडी शासनाने शेतकऱ्यांकडे सपशेल दुर्लक्ष केल्यानेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मुख्यमंत्री म्हणतात, मला शेतीतले काही कळत नाही. परंतु, रात्री १ वाजेपर्यंत पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी जसे लक्ष घालता तसे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घाला, असा सल्ला भाजपचे(BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील(Chandrakant Patil) यांनी आज पुणे येथे आंदोलना दरम्यान दिला.
सरकारचे काम म्हणजे
‘नाचता येईना म्हणे अंगण वाकडे’, असे असा टोला ही पाटील यांनी यावेळी लगावला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मावळ तालुक्यातील नायगाव येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या नायगाव शीतकरण केंद्रावर शनिवारी सकाळी राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन होत आहे. दूध दरवाढी हे आंदोलन झाले, यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, लोणावळच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे आदी उपस्थित होते.