प्रतिनिधी , जालना : जालना जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू हा आजार कोंबड्यांना कोणत्याही पोल्ट्री फार्म वर झाल्याचे निष्पन्न झालेले नसून, आपल्या जिल्ह्यात बर्ड फ्लू च्या अफवेमुळे कुक्कुटपालन व्यावसायिक अडचणीत आले आहे, हा चिकन मेळावा आयोजित करण्याचे मूळ कारण म्हणजे, सध्या मोठ्या चर्चेत असलेला बर्ड फ्लू हा कोंबड्यांचा आजार. या आजारामुळे अनेकांनी चिकन खाणे बंद केले आहे.
जालना जिल्ह्यात बर्ड फ्लू चा संसर्ग हा नसून त्या तंदुरुस्त आहेत व कुकूटपालन व्यवसायीकांनी वेळोवेळी त्यांच लसीकरण केलेले असते. सध्यातरी आपल्या परिसरात कुठल्याही आजाराचा धोका नसून चिकन खाणे हे नागरिकांनी सुरळीत चालू ठेवावे, जेणेकरून या व्यवसायावर अवलंबून असलेले कित्येकांचे संसार सुरळीत चालू राहतील आणी त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, तसेच लोकांच्या मनातील बर्ड फल्यू बद्दलची भीती निघून जावी, या करिता हे चिकन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
