प्रतिनिधी, जळगाव : आज बहुजन क्रांती मोर्चासह अन्य संघटनांनी भारत बंद पुकारला असून या अनुषंगाने मुक्ताईनगर येथे आज बंदला प्रतिसाद लाभला. प्रारंभी पदाधिकार्यांनी प्रवर्तन चौकातील महापुरूषांच्या शिल्पकृतींना वंदन करून जयघोष केला. यानंतर शहरातून फिरून व्यापार्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, व भारत मुक्ती मोर्चा यांच्यावतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती त्यामुळे आज मुक्ताईनगर शहरामध्ये बंदला चांगला प्रतिसाद लाभला आहे यावेळी बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शहरात फिरून नागरिकांना बंद करण्याचे आव्हान केले या आव्हानाला नागरिकांनीही उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे
