जनतेज न्युज

बांधकाम व्यावसायिकांची मनमानी चक्क नैसर्गिक नाल्यावर केले अनधिकृत बांधकाम…….

नागरिक त्रस्त, तर प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर……..

प्रतिनिधी , पुणे पिंपरी चिंचवड : परिसर हा औद्योगिक वसाहत म्हणून ओळखला जातो, याच मुळे इथे हक्का च घर मिळवणे आणी गुण्या गोविंदा ने राहण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून अनेक कामगार, या भागात राहतं घर शोधत असतात, त्याच मुळे पुण्या प्रमाणेच पिपरी चिंचवड भागात ही जमिनीच्या किंमती आकाशा ला गवसणी घालतात, एक एक इंच जमीन मिळवण्यासाठी इथे बांधकाम व्यावसायिक वाटेल ते कृत्य करताना दिसतात, जमिनीला सोन्याचा भाव मिळत असल्याने, सर्रास जमीन लाटणे जागे साठी खून खराबा करणे या मुळे या भागात गुन्हेगारी प्रवृत्ती बळावताना दिसते.
पिंपरी भागातील नेहरू नगर हा असाच परिसर शहरीकरण होत असताना पावसाचे पाणी नैसर्गिक पद्धतीने वाहून जावे म्हणून या भागात एक नाला अनेक वर्षांपासून होता, संतोषी माता मंदिर चौकातील हा नाला आता नाहीसा झाला आहे, कारण असे आहे बांधकाम व्यावसायिकानी या नाल्याला ही सोडले नाही यावर कोणाचा अधिकार या संभ्रम पालिका प्रशासनाला पडला असून पिपरी चिंचवड पालिका या विषयी मूग गिळून गप्पआहे, तर या भागातील रहिवासी सोसायटी मधील पाणी वाहून जाण्यासाठी कोणताच पर्याय शिल्लक राहिला नाही, करण असे आहे या बिल्डर ने ही जागा लाटली असून यावर खाजगी इमारत उभी केली आहे, या विषयी प्रशासनाला जाब विचारलाअसता कोणतेही उत्तर नागरिकांना मिळत नाहीये तर दुसरीकडे या बिल्डरची अरेरावेची भाषा भगत त्याच्या विषयी एक दहशत या भागात पाहायला मिळते.
आता1 या प्रश्नावर पालिकेचे सोंग घेणे कुणाच्या तरी जीवावर बेतू शकते
आणि बघूया कोण आहे हे बांधकाम व्यावसायिक काय नाव आहे पुढच्या बातमी……….