जनतेज न्युज

बाळे येथील ‘वैष्णवी हाईट्स’वर छापा ; सहा ‘बुकी’ ताब्यात

प्रतिनिधी , सोलापूर : सोलापूर ते पुणे रोडवर असलेल्या वैष्णवी हाइट्स बाळे या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर छत्तीस नंबर फ्लॅटमध्ये सोलापूर गुन्हे शाखेने छापा टाकून मटका घेणाऱ्या बुकीना अटक केली. यावेळी सहा जणांवर कारवाई करून पाच लाख 48 हजारांचा माल जप्त करण्यात आला. आज शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.