जनतेज न्युज

बियाणे – खताचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज – महेश तिर्थकर

प्रतिनिधी, उस्मानाबाद : सध्या खरीप हंगांम पेरणीची लगबग सुरू असुन बियाणे खत तुटवडा होईल असे सोशल माध्यमावर सुरू आहे. मात्र गतवर्षीप्रमाणे मार्केटमध्ये बियाणे उपलब्ध असुन शेतकऱ्यांनी महागडे पिशवी बियाणे घेण्यापेक्षा शेतकऱ्यांचे घरगुती बियाणे उगवणक्षमता स्वतः व शासकिय यंत्रनेकडून तपासुन घ्यावे तसेच रासायनिक खताच्या एखाद्या प्रकारची मागणी न करता उपलब्ध खत व त्यानुसार आवश्यक अन्य मात्रा कृषी कर्मच्याऱ्याशी बोलुन घ्याव्यात . बियाणे व खताचा काळा बाजार होऊ नये व शेतकऱ्याची लुट थांबावी म्हणुन सर्व कृषी सेवा केंद्र स्टॉक व विक्री अॅनलाईन केली आहे तसेच प्रत्येक तालुक्याला एक व जिल्हा एक भरारी पथक तयार केले आहे . लुट आढळल्यास तात्काळ पर्वांना रद्ध करण्यात येईल असा कृषी केंद्रांना इशारा देत तक्रार असेल तर ऑनलाईन , व्हॉटसप व लेखी करण्याचे अवाहन प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी महेश तिर्थकर यांनी केले आहे .