जनतेज न्युज

बीड जिल्हा दहा दिवसांसाठी लॉक डाउन, व्यापाऱ्यांमध्ये मात्र नाराजी

प्रतिनिधी , बीड : बीड जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रभाव पाहता जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलेले आहे. बीड जिल्ह्यामध्ये २६ मार्च ते चार एप्रील असा दहा दिवसांचा लॉकडाउन लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत. आजपासून चालू झालेल्या लॉक डाऊनला मनसे, अनेक नगरसेवक , लोकप्रतिनिधी व काही व्यापाऱ्यांनी नकार दिला होता. मात्र बीड जिल्ह्यातील गेवराई असो किंवा अनेक भागात सध्यातरी लॉक डाऊनचे कडक पालन होताना दिसत आहे.
जिल्हातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसा गणिक वाढताना दिसत आहे. आणी याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये दहा दिवसांचा लॉक डाऊन लावलेला आहे. तर लॉक डाऊनमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन गेवराई चे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड व मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी केले आहे. तर हा लॉक डाऊन योग्य नसल्याचे मनसे सह व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.