प्रतिनिधी , नवी मुंबई : बुलेट चोरी करून त्याची बनावट कागदपत्रे बनवून विक्री करणारी टोळी नवी मुंबई गुन्हे शाखेच्या माध्यमातून अटक करण्यात आली आहे. व चोरट्यांकडून 44 बुलेट व सुझुकी मोटार कार असा 1कोटी, 30 हजारांचा मुद्देमाल नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष 1 ने हस्तगत केला आहे. व आणखी 64 गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होणाऱ्या बुलेट चोरीमुळे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग व अप्पर पोलीस आयुक्त डॉ.बी.जी शेखर पाटील यांनी मोटारसायकल बुलेट चोर टोळीच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार, सहा पोलीस निरीक्षक रुपेश नाईक व पोलीस नाईक निलेश किंद्रे यांनी दिलेल्या, माहितीनुसार तांत्रिक तपासाच्या आधारे,तसेच या टोळीची माहिती मिळवून आरोपी असलेल्या घटनास्थळी प्रत्येक्ष भेट दिली व वेगवेगळी चार पोलीस पथके तयार करून, या टोळीतील, सोहेल शेख (28) व सौरभ मिलिंद करंजे (23) यांना वाशी मधून ताब्यात घेतले. तर यांचा साथीदार अमोल शिवाजी ढोबळे (35) याला म्हापे येथून अटक केले. यातील अमोल ढोबळे हा अट्टल चोर आहे.
त्यांनी चोरी केलेल्या 44 बुलेट व सुझुकी मोटार कार असा 1कोटी, 30 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. व आणखी 64 गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.
