जनतेज न्युज

बेकायदेशीर कामावरून कमी करणाऱ्या ठेकेदारावर पालिका आयुक्त फौजदारी गुन्हे दाखल करणार– खासदार राजेंद्र गावितानी

प्रतिनिधी , अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन च्या कामगारांना पालिकेच्या ठेकेदाराने १३० कामगारांना अचानक कामावरून काढल्याने युनियन ने २ दिवस लाक्षणिक उपोषण केल होत. त्याची दखल खासदार राजेंद्र गावित यांनी घेवून वसई विरार पालिका आयुक्त डी.गंगाथरन यांच्याशी यशस्वी चर्चा करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन देवून काढलेल्या कामगारांना पुन्हा टप्प्या टप्प्याने घेणार असल्याचे खासदार गावित यांनी सांगितले.