प्रतिनिधी , मुंबई : कोल्हापूर चे पालक मंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाना साधला आहे. भाजप सत्तेचा दावा का करत होतं हे भाजप का म्हणत होतं हे समोर आलं आहे असं सांगत भाजपने आघाडीत बिघाडीत आणण्याचा प्रयत्न केला असल्यचही ते म्हणाले. अहवाल बाहेर जातो, फडणवीस अहवाल दाखवतात हे राज्याच्या दृष्टीने घातक असुन भाजप सत्तेसाठी काहीही करण्याचा प्रयत्न करत असुन हे चुकीचं धोरण आहे असही सतेज पाटील म्हणाले.
गृहमंत्र्यांवर केलेल्या आपोपांबाबत गृहमंत्र्यांनी चौकशीला जातो म्हणून सांगितलं आहे, ते प्रामाणिक आहेत असं म्हणत सतेज पाटलांनी अनिल देशमुख यांची पाठराखन केली. भाजप शासकीय यंत्रणा हाताशी धरून सत्तेत येण्याचा प्रयत्न केला हे स्पष्ट झालं असुन फडणवीसांनी आपली विश्वासार्हता कायम राहायची असेल तर अहवाल कुणी दिला. हे सांगायला पाहिजे. राज्यातले अधिकारी असे वागण्यामागे केंद्राची सत्ता असुन त्यांच्या दबावाला राज्यातील अधिकारी बळी पडत असल्याचही ते म्हणाले.
त्याच बरोबर महाराष्ट्र तसेच मुंबई पोलिसांची उंचावलेली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न भाजपनं केला असुन भाजप मधील अनेक नेते महाविकास आघाडीत येण्यास तयार आहेत, त्यांना आधार मिळावा म्हणून सत्तेत येणार हे वारंवार फडणवीस तसेच इतर भाजपा नेत्यांकडून सांगतले जात आहे. असही सतेज पाटील म्हणाले. कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
